InterNICHE



  About InterNICHE
  News
  Alternatives
  Conscientious Objection
  Resources
  How you can help
  Sponsors
  Site Map
  Links
  HOME

Introduction in other languages


 



InterNICHE Co-ordinator
Nick Jukes
42 South Knighton Road 
Leicester LE2 3LP 
England 

Tel/Fax +44 116 2109652

coordinator@interniche.org



 Introduction - Maranthi

 

प्राण्यांवर केलेले प्रयोग तुम्हाला काय शिकवते असे तुम्हाला वाटते?

प्राण्यांची चिरफाड करण्यासाठी त्यांची हत्या का केली जाते आणि त्याचा उपयोग शिक्षणात प्रयोगासाठी का केला जातो याला कोणतेही कारण नाही. प्राण्यांना हानि न करता त्यांचा उपयोग करण्याच्या पुष्कळ आधुनिक व नविन पद्धती अस्तित्वात आहेत, आणि अनेक विश्वविद्यालयात त्याचे नमुने आहेत.

प्राण्यांना हानि न करता त्यांचा उपयोग करण्याच्या पद्धतीचे नैतिक शिक्षण हे वास्तविक शिकवणीसाठी अतिशय उपयोगी व योग्य आहे. वास्तविक चिरफाड आणि पडद्यावर प्रायोगिक प्रयोगशाळांपासून ते रोग्यांचा इलाज करण्याच्या पद्धतींच्या वास्तविक सत्यस्थितीत पूर्णपणे बुडेपर्यंत, प्रगत गणक तंत्रज्ञानात दिसण्याची शक्यता असते. रोग्यांचा इलाज करण्याच्या कुशलतेला आणि शल्यशास्त्र आचरणाबरोबर सूक्ष्म शल्यशास्त्र नमुने आणि कृत्रिम इंद्रिये व फीडबॅक यंत्रक्रियासहित अतिशय वास्तविक प्रतिमांना आधुनिक शिक्षणाची मदत असते. इतर पद्धती ह्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या स्वप्रायोगिकतेवर, मज्जातंतू/स्नायु उत्तेजनाबरोबर गणक यंत्रास जुळलेल्या प्रायोगिक उपकरणांच्या वापरावर अवलंबून असतात.

नैतिक शिक्षणात प्राण्यांचा समावेशही शक्य आहे. जेव्हा पशुरोगतज्ञ विद्यार्थी खऱ्या रोग्याबरोबर त्यांचा इलाज करण्याच्या कार्यात अनुभवी मित्रांना मदत करतात, तेव्हा ते त्या कुशलतेच्या विस्तृत श्रेणीविषयी शिकतात, त्याचबरोबर रोग्यांची काळजी व जीवनाचा आदर करण्यासही शिकतात – प्राण्यांवरील प्रयोगांच्या तुलनेत त्यांना शिकवले जाते की प्राणी हे प्रयोग झाल्यानंतर फेकण्याची वस्तू आहे. जेव्हा जीवशास्त्राचे विद्यार्थी प्राण्यांविषयी, त्यांच्या नैसर्गिक राहणीमानाबरोबर हल्ला न करण्याच्या पद्धती शिकतात, तेव्हा ते प्रयोगशाळेत शिकवलेल्या प्राण्यांच्या प्रयोगापेक्षा त्यांच्या वागणूकीबद्दल पुष्कळ अंशी शिकतात. आणि दान केलेल्या मानव शरीरावर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केलेली चिरफाड, आजारी पडून अथवा इजा होऊन मेलेल्या प्राण्यांवर पशुरोगतज्ञ व जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी केलेली नैतिक चिरफाड यांची तुलना केली जाते.

हत्या केलेल्या प्राण्यांचा उपयोग व त्यावरील प्रयोग हे विद्यार्थ्यांना त्या विषयाबद्दल जास्त शिकवत नाही तर उचित नैतिक पद्धतींविषयी शिकवते. तरीही, प्राण्यांवरील प्रयोग हे एकाकी तुमच्यावर प्रभाव टाकते की प्राण्यांचे जीवन हे महत्त्वाचे नाही. सजीव प्राण्यांचा उपयोग झाला की त्यांना फेकून द्या, असे शिकवणाऱ्या पशुरोगतज्ञ, संशोधक व वैद्यांची खरंच आपल्याला आवश्यकता आहे का? स्वतःचा स्वभाव व्यक्त करण्यास असमर्थ असल्यामुळे, चिरफाड करण्याच्या तबकावर अंत करण्यास किंवा हल्ला करण्याच्या प्रयोगास तयार राहण्यासाठी त्यांना जंगलातून आणले जाते अथवा आयुष्यभर पिंजऱ्यात बंद करण्यात येते?

प्रकाशित अध्ययनात दाखविले की विकसनशील व वैकल्पिक पद्धतींचा वापर करून ज्ञान, कुशलता आणि एक नैतिक सावधानता जास्त परिणामकारक पद्धतींनी प्राप्त करता येते. स्वतःचा नैतिक विश्वास बळजबरीने तोडण्यापेक्षा, प्राण्यांना हानि न करता त्यांचा उपयोग करून विद्यार्थी शैक्षणिक परिसराचा आनंद घेऊ शकतात. तुमच्यात हा बदल घडवून आणण्याची शक्ति आहे. प्राण्यांच्या हानिकारक उपयोगाचा अंत करण्यासाठी, तुम्ही Inter NICHE ला मदतीसाठी संपर्क साधा. एका नैतिक शिक्षणाची निवड करा.

News release
Other languages


 About InterNICHE
 News
 Resources
 Alternatives
 Conscientious
   Objection

 How you can help
 Sponsors
 Site Map
 Links
 HOME
o